अवती भवती डोंगर झाडी,Avati Bhavati Dongar Jhadi

अवती भवती डोंगर झाडी, मधी माझी ग सासुरवाडी
दोन मजली रंगीत माडी, दारी बांधली बैलांची जोडी

दोन डोंगरामधली वाट, वर चढाया अवघड घाट
घोडं घेऊन मुराळी आला, मी निघाले नांदायाला
नवी कोरी नेसून साडी


घोडं चालतंय दिडकी चाल, झोकं घेतंय कानात डुल
माझ्या गळ्यात वजरटिका ग नाकी नथिनं धरलाय ठेका

घातली हौसेनं सोन्याची बुगडी

सख्या संगती एकांतात, प्रीत फुलंल अंधारात
हुईल काळजात गोड गुदगुदली, लाल होतील गाल मखमली
मिळंल मिठीत मधाची गोडी

No comments:

Post a Comment