असा बेभान हा वारा,Asa Bebhan Ha Vara

असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ ?
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ ?

जटा पिंजून या लाटा विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जिवाचे फूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू ?

कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडिले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नावही मागे
दिले हे दान दैवाने करी माझ्या कशी घेऊ ?

जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ ?



No comments:

Post a Comment