अंगणी गुलमोहर फुलला,Angani Gulmohar Phulala

अंगणी गुलमोहर फुलला
लाल फुलांच्या लिपीतला हा अर्थ मला कळला

गतसाली हा असाच फुलता

तुम्ही पाहुणे आला होता
याच तरुतळी अनोळखीचा परिचय ना घडला

ते डोळे ती हसरी जिवणी
जपली मी तर अजुनि चिंतनी
आठव येता वरुनी माथी मोहर ओघळला

नजरभेट ती, ओळख थोडी
अवीट त्यातिल अबोल गोडी
वसंत आला, याल तुम्हीही, कोकिळ कुजबुजला

No comments:

Post a Comment