अंगणात रंगली ग,Anganat Rangali Ga

बारा घरच्या बारा जणी खेळितो अंगणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी

काय सांगू, माझं माहेर मोलाचं

कसं सांगू ? राजा इंद्राच्या तोलाचं
माहेराचा ठेवा असा देवाजीची करणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी


चौसोपी माझा माहेरचा वाडा
मीठ-मोहऱ्यांनी दृष्टी कुणी काढा
हिरे-माणकं भरली जशी वाड्याच्या नौखणी

अंगणात रंगली ग माहेरची गाणी

माहेराची माया कुणाला गावं ना?
माहेराचं सूख पदरात मावंना
आई-बाबा-दादा-वैनी सारी आबादानी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी

म्हायेराचा लळा जीवाला लागीला

सासरी ग जीव आबाळी टांगीला
म्हायेरीच्या वाटं डोळं लागती की झुरणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी

म्हायेराचं दिसं सुखाचं सरतील
मांडवात डोळं पाण्यानं भरतील
माहेरीच्या घरची मग होशील पाहुणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी

2 comments: