पाहुणी आली माझ्या घरी
अंबिका माया जगदीश्वरी
या डोळ्यांच्या दोन रांजणी
पस्ताव्याचे भरले पाणी
त्या पाण्याने न्हाऊ घालिते
बसवुन पाटावरी
रक्तामधले इमान बळकट
त्याचा भाळी भरिते मळवट
भलेपणाची फुले ठेविते
वाकुन पायावरी
चुका-चाकवत केली भाजी
भावभक्तिची भाकर ताजी
लेक दरिद्री तुझी विनविते
आई भोजन करी
No comments:
Post a Comment