अभिमानाने मीरा वदते,Abhimanane Meera Vadate

अभिमानाने मीरा वदते
हरिचरणाशी माझे नाते

गोकुळातला मुरलीवाला
मुरली घुमवित स्वप्नी आला

जादुगार तो श्याम सावळा
त्याच्यासाठी मीहि नाचते

रुणुझुणु रुणुझुणु पैंजण बोले
जिवाशिवाचे नातेजुळले

सुखदु:खाचे बंधन तुटले
सरले माझे इथले नाते

उपहासाने खुशाल बोला
अमृत गमते जहरहि मजला

भजनि गायनी जीव रंगला
मूक भावना अर्थ शोधते

No comments:

Post a Comment