आली दिवाळी आली दिवाळी
घर घर उजळित मानवतेचे तेजाच्या पाउली
नक्षत्रांचे बांधून तोरण
मनामनांचे करुनी मीलन
दिव्य ज्योत ही आनंद-हृदयी
गोविंदे लाविली
रत्नकांचनी लावुन ज्योती
मंगलमय सजवून आरती
बहीण लाडकी भाऊराया
ओवाळू लागली
होउन बंधू ये रे चंद्रा
दीपांच्या राउळी
भावाविण हा दिन सोन्याचा
आज उदासिन या बहिणीच्या
होउन बंधू ये रे चंद्रा
दीपांच्या राउळी
No comments:
Post a Comment