चांद भरली रात आहे Chand Bharali Raat Ahe

चांद भरली रात आहे
चांद भरली रात आहे, प्रियकराची साथ आहे
मोगर्‍याच्या पाकळ्यांची मखमली बरसात आहे

मंद वाहे गंध वारा
दूर चंदेरी किनारा
अमृताच्या सागरातून जीव-नौका जात आहे

ना तमा आता तमाची
वादळाची वा धुक्याची
आजला हातात माझ्या साजणाचा हात आहे

Lyrics - Kusumagraj कुसुमाग्रज
Music - Sriniwas Khale श्रीनिवास खळे
Singer - Ashalata Wabgaokar आशालता वाबगावकर
Natak - Vidushak विदूषक