अपार हा भवसागर दु:स्तर Apaar Ha Bhav Sagar Duhstar

अपार हा भवसागर दु:स्तर
तुझ्या कृपेविण कोण तरे
जय जय दुर्गे शुभंकरे !

तुझ्या कृपेने संकट टळते
तुझ्या कृपेने वैभव येते
तुझ्या कृपेने पंगू देखिल
करी उल्लंघन गिरीशिखरे !

तुझ्या कृपेचा मेघ बरसता
आशेची उद्याने फुलता
ह्या संसारी, विश्वमंदिरी
आनंदाचा गंध भरे !

दुराचार दंभाच्या नगरी
अनाचार अवसेच्या तिमिरी
त्रिशूळ तव चमकता अचानक
दुरिताचा अंधार नुरे


L - विद्याधर गोखले,
M - विश्वनाथ मोरे,
S - अनुराधा पौडवाल,  S - सुरेश वाडकर,
सुंदरा सातारकर

No comments:

Post a Comment