अपराध मीच केला Aparadh Mich Kela

अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी !
जाणीव हीच माझ्या जीवा सदैव जाळी !

जन्मात एक झाली ही प्रीतभेट देवा
डोळ्यांतुनी हळू या हृदयात पाय ठेवा
बोलू न द्यायची मी भलतेच लाभवेळी !

राष्ट्रार्थ जन्मलेला मी पाहुणा क्षणाचा
भासात गुंतवावा मी जीव का कुणाचा ?
अक्षम्य चूक झाली, मी प्रीत दाखवीली !

तू लाख पीडितांचा आधार अन्‌ विसावा
हा पोच मूढ माझ्या प्रीतीस का नसावा ?
मी संत मोहवीला जो मग्न संतमेळी !

आता पुढील जन्मी संसार मी करीन
ही स्वप्नभेट वक्षी मी तोवरी धरीन
सद्‌भाग्य हे सतीचे मिरवीन नित्य भाळी !


L - ग. दि. माडगूळकर,
M - सुधीर फडके,
S - मालती पांडे, S - सुधीर फडके
वंदे मातरम्‌ (१९४८)

No comments:

Post a Comment