अगं नाच नाच राधे उडवूया Aga Nach Nach Radhe

यमुनेच्या काठावर किसन मुरलीधर
कुणी म्हणे गिरीधर नरवर नटवर
कुंजवनी खेळतो रास रंग
एक नटरंगी नार करी सोळा शिणगार
आली छ्न्‌न्‌न्‌ नाचत उडवी बहार
किती आल्या गोपगोपिका
कन्हैया सखी छेडिता राधा सखीला
कसा कसा कसा ....... असा !

अगं नाच नाच राधे उडवूया रंग
रंगामध्ये भिजंल तुझं गोरं गोरं अंग

घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी
आडवाटेवरी आज अडलीस कशी
मदनाचं रूप घेई राजा शिरीरंग

ढंग न्यारा तुझा असा तरुनपना
तुझा शिणगार करतोया खानाखुना
दंडामध्ये गचली ग काचोळी ही तंग

भरली पिचकारी मी आता लपशील किती
लाज पदरामध्ये सांग जपशील किती
सुरावरी माझ्या तुझा ताल झाला दंग

L - जगदीश खेबूडकर
M - विश्वनाथ मोरे
S - उत्तरा केळकर, S - सुरेश वाडकर
गोंधळात गोंधळ (१९८१)


No comments:

Post a Comment