" अजब सोहळा ! अजब सोहळा !
माती भिडली आभाळा !
मुकी मायबाई
तिला राग नाही
तुडवून पायी तिचा केला चोळामोळा !
किती काळ साहील ?
किती मूक राहील ?
वादळली माती करी वा-याचा हिंदोळा !
कुणी पाय देता
चढे धूळ माथा
माणसा रे, आता बघ उघडून डोळा !
मातीची धरती
देह मातीचा वरती
माती जागवू दे मातीचा जिव्हाळा !
गीत - शान्ता शेळके
संगीत - भास्कर चंदावरकर
स्वर - रवींद्र साठे
चित्रपट - गारंबीचा बापू (१९८०)
No comments:
Post a Comment