Showing posts with label S-वैशाली माडे. Show all posts
Showing posts with label S-वैशाली माडे. Show all posts

कुलवधू,Kulavadhu

माझी डोली चालली ग दूरदेशी नव्या गावा
तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्नांचा रावा
तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ
तिथले ऊनपाऊस भरतील माझी ओंजळ

स्वप्न राही मागे आता व्यथा सतत उरात
नव्या उंबऱ्याची आस जागे तरीही मनात

एक नदी सारखी वाहते मी जणू
पाउलखुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू