Showing posts with label S - सुमन कल्याणपूर. Show all posts
Showing posts with label S - सुमन कल्याणपूर. Show all posts

अभंगाची गोडी करी Abhangachi Godi Kari Jyas Vedi

अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
तोचि पुण्य जोडी, पंढरीचे

टाळ मृदंगाची, वीणा साथ ज्याची
भक्ती पाहि तोची, विठ्ठलाची

बघा संतमेळा सदा रंगलेला
तिरी बैसलेला, देवापाशी
माहेर आपुले मंदिर तेथले
संत गुंगलेले, भजनात

गाभा-यात कोण उभा विठु जाण
चोखोबा तिष्ठत, अंगणात
पहा हा सोहळा मोक्षाचा उमाळा
पुण्य पदराला बांधावे हो


L - शांताबाई जोशी,
M - दशरथ पुजारी,
S - सुमन कल्याणपूर,

अजून नाही जागी राधा Ajun Nahi Jagi Radha

अजून नाही जागी राधा,
अजून नाही जागे गोकुळ;
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ.

मावळतीवर चंद्र केशरी;
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन.

विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यामधले थेंब सुखाचे:
""हे माझ्यास्तव.... हे माझ्यास्तव ....""

अक्रुरा नेउ नको माधवा