हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
झटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता
डोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्तात जागू दे आज भवानी माता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश
दाही दिशीं घुमू दे शिवछत्रपतींचा घोष
लढण्या संग्राम आज हा
बळ दे या मनगटी आम्हां
करण्या संहार शत्रूचा, जन्म घे पुन्हा आता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
तलवार नाचते रणी, ऐसा पेटतो राग
जगो मरो जीव हा, फुले महाराष्ट्राची बाग
जगण्या सिद्धांत आज हा, शक्ती दे शतपटी आम्हां
चल चल रे ऊठ घालिते साद मराठी आता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
Showing posts with label M-अजित-अतुल-समीर. Show all posts
Showing posts with label M-अजित-अतुल-समीर. Show all posts
कळले नाही कधी उसवले,Kalale Nahi Kadhi Usavale
कळले नाही कधी उसवले लक्तर जगण्याचे
गेले फाटून उडण्या आधी पतंग स्वप्नांचे
नशिबी आली फरपट माझ्या कारण चुकली वाट
नकोस गिरवू तीच उजळणी तूही पुन्हा दिनरात
चुकली सारी गणिते केवळ शून्य उरे हाती
उडूनी गेली वर्षे झाली जन्माची माती
पसार झाली नाती सारी सोडून अंधारात
नकोस गिरवू तीच उजळणी तूही पुन्हा दिनरात
जाती भावना जळूनी जेव्हा व्यवहारी जग छळते
गुंता होतो जगण्याचा अन नियती भेसुर हसते
चुकले कोठे कळण्या आधी होते वाताहात
नकोस गिरवू तीच उजळणी तूही पुन्हा दिनरात
गेले फाटून उडण्या आधी पतंग स्वप्नांचे
नशिबी आली फरपट माझ्या कारण चुकली वाट
नकोस गिरवू तीच उजळणी तूही पुन्हा दिनरात
चुकली सारी गणिते केवळ शून्य उरे हाती
उडूनी गेली वर्षे झाली जन्माची माती
पसार झाली नाती सारी सोडून अंधारात
नकोस गिरवू तीच उजळणी तूही पुन्हा दिनरात
जाती भावना जळूनी जेव्हा व्यवहारी जग छळते
गुंता होतो जगण्याचा अन नियती भेसुर हसते
चुकले कोठे कळण्या आधी होते वाताहात
नकोस गिरवू तीच उजळणी तूही पुन्हा दिनरात
उगवली शुक्राची चांदणी,Ugavali Shukrachi Chandani
अडवू नका मज सोडा आता, पुरं झालं ना धनी
उगवली शुक्राची चांदणी !
( हिचं ऐका पाव्हणं, काय हे वागणं शोभतंय् व्हय् तुम्हाला ?
हिचा हात धरून, गालामध्ये हसणं शोभतंय् का तुम्हाला ?
जरा लाज धरा हो येता-जाता पाहिल् ना हो कुणी ! )
उगवली शुक्राची चांदणी !
निरव शांतता अवतीभवती, रातकिडा हे किरकिर करती
भिरभिर उडती वर पाकोळ्या धडधड होते मनी
उगवली शुक्राची चांदणी !
लवलव करती हिरवी पाती, चमचमणाऱ्या चांदणराती
वाऱ्यावरती गंध दरवळे केतकीच्या या बनी
उगवली शुक्राची चांदणी !
उगवली शुक्राची चांदणी !
( हिचं ऐका पाव्हणं, काय हे वागणं शोभतंय् व्हय् तुम्हाला ?
हिचा हात धरून, गालामध्ये हसणं शोभतंय् का तुम्हाला ?
जरा लाज धरा हो येता-जाता पाहिल् ना हो कुणी ! )
उगवली शुक्राची चांदणी !
निरव शांतता अवतीभवती, रातकिडा हे किरकिर करती
भिरभिर उडती वर पाकोळ्या धडधड होते मनी
उगवली शुक्राची चांदणी !
लवलव करती हिरवी पाती, चमचमणाऱ्या चांदणराती
वाऱ्यावरती गंध दरवळे केतकीच्या या बनी
उगवली शुक्राची चांदणी !
Subscribe to:
Posts (Atom)