Showing posts with label सुदेश भोसले. Show all posts
Showing posts with label सुदेश भोसले. Show all posts

तिथे नांदे शंभू TITHE NANDE SHAMBHU


बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

दक्षशापे चंद्र पुरा कोमेजला
शिवकृपायोगे पुन्हा तेजाळला
ज्योतिर्लिंग हे पहिले ब्रह्मदेवे स्थापियले
सोरटीचा नाथ नामे याची ख्याती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

श्रीशैल गिरीशिखरी शिवतेज वास करी
सती चंद्रावतीसाठी इथे आले उमापती
शैलमल्लिकार्जुन गुण भक्तजन गाती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

दैत्यदूषण करी निर्दाळण हुंकाराने त्रिपुरारी
तोच रुद्र सहज होय गवळ्याचा कैवारी
तोच सांब झालासे महाकालेश्वर चित्ताकाठी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

ॐकार होऊन ये चंद्रमौली
विंध्याद्रीची कामना पूर्ण झाली
ॐकार तो जाण हा अमलेश्वर
हीच जाण शिवकुटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

रावणासी फसवुनी गजानने वसविले
ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ
देवांचेही धन्वंतरी ज्याच्यामधे प्रवेशले
ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ
छायेपरी जिथे आहे संगती पार्वती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

भीमनामे दानवाने बह्मदेवाच्या वराने
केले सार्‍या जगतासी त्राही त्राही त्राही
संहाराया त्या दैत्यासी घेई भीमस्वरुपासी
हर विश्व व्यापुनीया राही राही राही
भीमाशंकराचे ठायी नदी भीमा जन्म घेई
वनी डाकिनीया शंकराच्या अभिषेकासाठी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

जानकीने रचियले
वालुका लिंग हे श्रीरामाने स्थापियले
भाविकास साधकास नित देत आस
उभा सेतुबंधी रामेश्वर कटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

ब्रह्मवाणी ठरु नये खोटी याच्यासाठी इथे शिव भस्मसात झाले हो
त्याच भस्मातून फिरुनीया तेजाळून तिथे ज्योतिर्लिंग प्रकटले हो
अंघानागनाथ जळावसे सदा येथ
नाग जनासाठी तेच तया त्रिकाळी पूजिती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

कैलास सोडुन ये सांब भोळा
भुलला कसा या वाराणशीला
विश्वेश्वर शिवक्षेत्र सदैव स्मर
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

गोदावारी कटी एका ठायी नांदताती तिघे
ब्रह्मा विष्णु महेश
वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस
भक्त लोटती भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास
त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

गंगाधरा, केदारनाथ कर्पूरगौर
शीवलील कंठ सूख शांती देत
भवदु:ख दूर करी विश्वनाथ
केदारनाथ केदारनाथ
परतत्व येथ पावेल शांती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

श्री घॄष्णेश्वर वेरूळ गावी
काय तयाची महती गावी
विरह न साहे कैलासाला
लेणे होऊन समीप आला
ग्रहणकाली शीवपावन वेडी
शीवभक्तांची दाटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

Lyrics -सुधीर मोघे SUDHIR MOGHE
Music -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Singer -अनुराधा पौडवाल ,सुदेश भोसले ANURADHA PAUDWAL,SUDESH BHOSALE
Movie / Natak / Album -माहेरची माणसं MAHERACHI MANAS