Showing posts with label भक्‍त पुंडलीक (१९७५). Show all posts
Showing posts with label भक्‍त पुंडलीक (१९७५). Show all posts

घेऊन रूप माझे , Gheun Roop Majhe

घेऊन रूप माझे ही रात्र गाऊ दे
नाथा असेच आता मज धुंद राहू दे

वर्षाव का फुलांचा झाला नव्या प्रभाती
गंधात चिंब न्हाली माझी सुवर्णकांती
डोळ्यांपुढे मला ते सुख स्वप्‍न पाहू दे

मी आज यौवनाचे हे लाजवस्‍त्र ल्याले
दंव झेलता कळीचे अपसूक फूल झाले
देवा तुझ्या प्रती हे सर्वस्व वाहू दे

विजयात आज माझ्या शरणागती लपावी
ही ठेव संचिताची आजन्म मी जपावी
आलिंगनी तुझ्या या एकरूप होऊ दे