बोलतो ते BOLATO TEबोलतो ते चूक आहे की बरोबर
बोलतो ते चूक आहे की बरोबर
मी बरोबर वा खरोखर ती बरोबर
बोलतो ते चूक आहे की बरोबर

काय डोळ्यातून माझ्या दोष आहे
काय डोळ्यातून माझ्या दोष आहे
कोणताही रंग का नाही बरोबर 
बोलतो ते चूक आहे की बरोबर

बांध तू ताईत स्वप्नांचा उद्याच्या
बांध तू ताईत स्वप्नांचा उद्याच्या
राख थोडी राहू दे माझी बरोबर 
प्रश्न माझे अडचणीचे एवढे की
प्रश्न माझे अडचणीचे एवढे की
उत्तरे सांगू नका कोणी बरोबर
बोलतो ते चूक आहे की बरोबर

चूक तू होतीस हे शाबित होता
चूक तू होतीस हे शाबित होता
काय कळूनी फायदा  की मी बरोबर
बोलतो ते चूक आहे की बरोबर

Lyrics -संदीप खरे SANDIP KHARE
Music -अविनाश विश्वजीत AVINASH VISHVJIT

No comments:

Post a comment