तुझा तसाच गोडवा TUZA TASACH GODAVA

तुझा तसाच गोडवा असेलही नसेलही

तसा उन्हांत गारवा, असेलही नसेलही

अजून रोज हिंडते नभात एक पाखरू

उदास तोच पारवा असेलही नसेलही

निवांत एकटाच मी, निवांत ही तुझी नशा

तुझ्या स्वरात मारवा, असेलही नसेलही

किती अनोळखी इथे मला सुगंध भेटती

हवी तशीच ही हवा, असेलही नसेलही

Lyrics -BHIMRAO PANCHALE  भीमराव पांचाळे
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET