तुळशीमाते तुला पूजिते TULASHIMATE TULA PUJITE

तुळशीमाते तुला पूजिते करिते तव मी ध्यान
घरात नांदो सुख-शांती ही दे मज तू वरदान

देह झिजावा चंदनापरी, सदैव माझा मम संसारी
भाग्य न दुसरे यासम आई आस एक ही असे अंतरी
गृहलक्ष्मी मी या संसारी अन्य नको सन्मान

भिक्षांदेही म्हणता याचक भरुनी ओंजळ दान देऊ दे
येता दारी दीन भुकेला दोन घास मज त्यास घालू दे
तुझ्या कृपेने घरीदारी या पडो न आई वाण

दृष्ट न लागो संसाराला, राजधानी ही माझे घरकूल
सासू-सासरे मायबाप हे, नणंद माझी तशीच प्रेमळ
पती चरणांशी सुवासिनीचे मंगल तीर्थस्थान

Music -सुरेश कुमार SURESH KUMAR
Singer -अनुराधा पौडवाल ANURADHA PAUDAWAL
Movie / Natak / Album - घरचा भेदी GHARACHA BHEDI

No comments:

Post a Comment