मी किनारे सरकताना पाहिले MI KINARE SARAKATANA PAHIJE

मी किनारे सरकताना पाहिले

मी मला आक्रंदताना पाहिले

कोणती जादू अशी केलीस तू

मी धुके गंधाळताना पाहिले

पाकळ्या खंतावूनी जेव्हा गळाल्या

मी फुलांना झिंगताना पाहिले

लोक ते मागे फिराया लागले

मी तुला रेंगाळताना पाहिले

Lyrics - भीमराव पांचाळे BHIMRAO PANCHALE
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET

No comments:

Post a Comment