भावनांचा तू भूकेला BHAVANANCHA TU BHUKELA

भावभोळया भक्तीची ही एक तारी
भावनांचा तू भूकेला रे मुरारी

काजळी रात्रीस होसी तूच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
मी तशी आले तुझ्या ही आज दारी

भाबडी दासी जनी, गाताच गाणी
दाटून आले तुझ्या डोळयात पाणी
भक्तीचा वेडा असा तू चक्रधारी

शापिलेली ती अहिल्या मुक्त केली
आणि कुब्जा स्पर्श होता दिव्य झाली
वैभवाचा साज नाही मी भिकारी

अंतरीची हाक वेडी घालते रे
वाट काट्यांची अशी मी चालते रे
जाणिसी माझी व्यथा ही तूच सारी


Lyrics -मंगेश पाडगांवकर MANGESH PADAGAOKAR
Music -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Singer -श्रीनिवास खळे SHREENIWAS KHALE
Movie / Natak / Album -गीत GEET

No comments:

Post a Comment