वादल वारं सुटल गं WADAL WAR SUTAL G
वादल वारं सुटल गं, वादल वारं सुटल गं,
वार्‍यानं तुफान उठलं गं,वार्‍यानं तुफान उठलं गं
भिरिभर वार्‍यांत, पावसाच्या मार्‍यात, सजनानं होडीला पान्यात लोटलं
वादल वारं सुटलं गं
वार्‍यानं तुफान उठलं गं

गडगड ढगांत बिजली करी
फडफड शिडात, धडधड उरी
गडगड ढगांत बिजली करी
फडफड शिडात, धडधड उरी
एकली मी आज घरी बाय
संगतीला माझ्या कुनी नाय
एकली मी आज घरी बाय
संगतीला माझ्या कुनी नाय
सळसळ माडांत, खोपीच्या कुडांत
जागणार्‍या डोल्यांत सपान मिटलं
वादल वारं सुटलं गं
वार्‍यानं तुफान उठलं गं

सरसर चालली होडीची नाळ
दूरवर उठली फेसाची माळ
सरसर चालली होडीची नाळ
दूरवर उठली फेसाची माळ
कमरेत जरा वाकूनिया
पान्यामंदी जालं फेकूनिया
कमरेत जरा वाकूनिया
पान्यामंदी जालं फेकूनिया
नाखवा माझा, दर्याचा राजा
लाखाचं धन यानं जाल्यांत लुटलं
वादल वारं सुटलं गं
वार्‍यानं तुफान उठलं गं

भिरिभर वार्‍यांत, पावसाच्या मार्‍यात, सजनानं होडीला पान्यात लोटलं
वादल वारं सुटलं गं
वार्‍यानं तुफान उठलं गं
वादल वारं सुटलं गं
वार्‍यानं तुफान उठलं गं
वादल वारं सुटलं गं
वार्‍यानं तुफान उठलं गं
वादल वारं सुटलं गं
वार्‍यानं तुफान उठलं गं
गीतकार : , गायक : , संगीतकार : 

Lyrics -शांता शेळके SHANTA SHELAKE
Music -पं. हृदयनाथ मंगेशकर P.HRUDAYNATH MANGESHAKAR
Singer -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -कोळी गीत KOLI GEET

No comments:

Post a Comment