ऊठ मुकुंदा सरली रात UTH MUKUNDA SARALI RAT

ऊठ मुकुंदा सरली रात
सोनपाउली आली पहाट

आकाशातील विझल्या तारा
झुळझुळतो हा पहाट वारा
समईतली मंदावे वात

मिटली कळी उघडी डोळे
पालवीतुनी किलबील चाले
उंच आरवी सृष्टीचा भाट

गोधणीतली हंबरे धेनू
गोपाळ रानी वाजवी वेणु
आनंद दाटे दशदिशांत

Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D. MADAGULAKAR
Music -सुधीर फडके SUDHIR FADAKE
Singer -सुमन कल्याणपूर SUMAN KALYANPUR
Movie / Natak / Album -सप्तपदी SAPTAPADI

No comments:

Post a Comment