देवा, तुला शोधू कुठं DEVA TULA SHODHU KUTH

कुठल्या देशी, कुठल्या वेशी, कुठल्या रूपात ?
देवा, तुला शोधू कुठं ?

तेहतीस कोटी रूपे तुझी, तेहतीस कोटी नामे तुझी
परि तू अज्ञात
देवा, तुला शोधू कुठं ?

कोठे असशी तू आकाशी, कुठल्या गावी कोठे वसशी ?
कुण्या देवळात ?
देवा, तुला शोधू कुठं ?

भले-बुरे जे दिसते भवती, भले-बुरे जे घडते भवती
तिथे तुझा हात
देवा, तुला शोधू कुठं ?

स्वच्छंदी तू स्वत:चा सखा, येथे रमसी सांग उगा का ?
या बाजारात
देवा, तुला शोधू कुठं ?

Lyrics -सुधीर मोघे SUDHIR MOGHE
Music -मंगेश धाडके MANGESH DHADAKE
Singer - शाहीर देवानंद माळी SHAHIR DEVANAND MALI
Movie / Natak / Album - देऊळ DEOUL 

No comments:

Post a Comment