रिमझिम धून RIMZIM DHUNपहिला पाऊस पहिली आठवण
पहिल्या घरटयाच पहिल आंगन
पहिली माती पहिला गंध
पहिल्या मनात पहिलाच बंध
पहिला आभाळ पहिल रान
पहिल्या झोळीत पहिलच पान
पहिल्या तळ्यात पहिलाच थेंब
पहिल्या सारीचा पहिलाच थेंब
पहिलाच पाऊस पहिलीच आठवण
पहिलच घरट पहिलच आंगन


रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून

गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन

वार्‍यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्‍यात आता, सुरात तुला मी कवळून


Lyrics -सौमित्र SAUMITR
Music -मिलिंद इंगळे MILIND INGALE
Singer -मिलिंद इंगळे MILIND INGALE
Movie / Natak / Album - गारवा GARAVA

No comments:

Post a Comment