पार्वती वेची बिल्वदळें PARVATI WECHI BILVDALE

पार्वती वेची बिल्वदळें
शिवमूर्तीचे करिती चिंतन भावमुग्ध डोळें

धुके तरळते धूसर धूसर
भस्ममाखले दिसे चराचर
उष:कालचा प्रहर नव्हे हा, सांबरूप भोळे

फुले लहडली प्राजक्तावर
तो तर भासे प्रसन्न शंकर
सुमने कसली हास्य हराचे भूमीवर निथळेLyrics -ग. दि. माडगूळकर G.D.MADAGULAKAR
Music -दत्ता डावजेकर DATTA DAVAJEKAR
Singer -सुमन कल्याणपूर SUMAN KALYANPUR
Movie / Natak / Album -सुखाची सावली SUKHACHI SAWALI

No comments:

Post a Comment