कान्हु घेऊन जाय KANHU GHEUN JAY

कान्हु घेऊन जाय रानी

धेनू घेऊन जाय

संगे चाले श्रीराम सुदाम

मागे बोले माय

म्हणे माझ्या लेकरा रे

माझ्या वासरा रे

उशीर नको लावू वेगे

परत घरी ये रे

हाती राहे खीर लोणी कोण दुजे खाय

कोण दुजे खाय

डोळ्यातली बाहुली तू

राजा सोन्या रे

ओंजळीत आला जणू

चैत चांदवा रे

सूर्य आता माथी तुझे

पोळतील पाय

Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET