हसू कसं येतं HASU KAS YET

हसू कसं येतं

दिवस सरतात ….
रात्री सरतात
काळाच्या गर्तेत
वर्षही भरकटतात …. १

प्रेम उधळेल आपल्यावर
असं कुणीच नसतं जवळ
जख्मेमधून रक्त आपल्या
वहात असतं भळभळ ….२

मन करावं मोकळं असे
सगळे असतात दूर
मनामध्ये आठवणींचे
खोल रिते सूर  …. ३

कुणीच नसतं अवतीभवती
उदास दिवस भयाण राती
पायाखाली वाट सोबती
वरती आभाळ भुईस माती  ….४

नकोनकोश्या आठवणींचा
हळूच बसतो चटका
नको नको म्हणता म्हणता
रागही येतो लटका …. ५


Lyrics -VIJAY SHENDAGE विजय शेंडगे
Movie / Natak / Album -कविता KAVITA

No comments:

Post a Comment