आठवांच्या गर्द रानी पाखरू हे तुझे AATHAVANCHYA GARD RANI PAKHARU HE TUJHE



सावर रे, मन हळवे
मन हळवे का होई बावरे
मौन रेशमी ही सोनपालवी
रिमझिमत्या धारांत सजली स्वप्ने नवी
राजसा हे गीत माझे, सूर सारे तुझे
गंध दाटला पावसात न्हाहता
चिंब जाहले जाणता अजाणता

पापणी सांगते गूज हे लाजुनी
श्वास हा वेडावला उधाणता
शहारली सांज ही, मेघ धून आसावली
साऱ्या दिशांना भास होई का तुझा
धुंद गाते रान सारे हासले चांदणे
गंध दाटला पावसात न्हाहता
चिंब जाहले जाणता अजाणता

माझ्या वाटेवरी, हिरव्या पानांतुनी
श्रावणगाणे कोण गाई सांग ना
भूल घातली कोणी निळी निळी
बेहोष वारा मनरंगी ओल्या सरी
आठवांच्या गर्द रानी पाखरू हे तुझे
गंध दाटला पावसात न्हाहता
चिंब जाहले जाणता अजाणता

Lyrics -स्पृहा जोशी SPRUHA JOSHI
Music -ऋषिकेश कामेरकर HRSHIKESH KAMERAKAR
Singer -महालक्ष्मी अय्यर MAHALAXMI IYER
Movie / Natak / Album -तू, मी आणि पाऊस (२०१२) 

No comments:

Post a Comment