अशी ये नजीक AASHI YE NAJIK

अशी ये नजीक येथे बैस घडीभर
उन्हाच्या मिठीत जशी ओलीचिंब सर
ओझरते, ओझरते, काहीतरी बोल
जरा जरा वर-वर, जरा जरा खोल

अशी नजिकता तरी असा हा दुरावा
सरीच्या झळांचा नाही उन्हाला सुगावा
कसे सांगू तुझ्याविना माझे काय होते
श्वास घ्यावा साधा तरी तुला साद जाते

अशी ये नजीक आज जणू उद्या नाही
असे नामशेष होणे पुन्हा पुन्हा नाही
माझे उन्हपण तुझे सरीपण सरो
पुरावा म्हणून एक इंद्रधनू उरो

Lyrics -वैभव जोशी VAIBHAV JOSHI
Music -सुमीत बेल्लारी - रोहित नागभिडे SUMIT BELLARI-ROHIT NAGBHIDE
Singer -स्वप्नील बांदोडकर - सावनी शेंडे SWAPNIL BANDODKAR-SAVNI SHENDE
Movie / Natak / Album -तप्तपदी (२०१४) TAPTPADI

No comments:

Post a Comment