साजनी सई ग SAAJANI SAI G

साजनी सई ग,साजन नाही घरी 
सुकली जाई ग,साजनी सई ग !

दिस गेले किती सखा ,दूरदेशी गेलयाला
पुशीते मी आँसू त्याचा ,रेशमी शेल्यला
सोन्याच्या ताटामध्ये ,पक्वान्ने पांच ग 
सख्याच्या आठवाने ,घास जाइना ग !

चंदनी झोपळा बाई,हालतो ग डुलतो 
भरजरी पदराचा ,शेव मागे झुलतो
पदरला आठवते ,सख्याची बोली ग 
ऐकताना होते माझी, पापणी ओली ग !


Lyrics -शांता शेळके SHANTA SHELAKE
Music -मीना खड़ीकर  MEENA KHADIKAR
Singer -उषा मंगेशकर  USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु  BANYABAPU

No comments:

Post a Comment