ना ना ना नाहिरे नाही NA NA NA NAHIRE NAHI

ना ना ना नाहीरे नाही  रे,जायचे तू नाही रे
चुकले मी समजून घे ना,नको दूर जाऊ साजणा  
हसता बोलता अरे,चुकले म्हणते ना 
बोलणार नाही पुन्हा  !

बालवयातली राजा,जवळीक तुझी माझी 
आज कशाने रे व्हावी,अशी इतराजी 
मनाऊ मनाऊ किती,विनवु तुला पुन्हा   
पदरात घेई रे गुन्हा  !

चिमनीच्या दातानी रे,तुला देत होते खाऊ 
रुसवा हा काढायला,आज काय राजा देऊ 
झगड़ा मी तव जरा,आठवु जुना बाळपणा 
अवखळ तसा हास ना  !


Lyrics - शांता शेळके  SHANTA SHELKE
Music -मानस मुखर्जी  MANAS MUKHRJI
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album - बन्याबापु  BANYABAPU

No comments:

Post a Comment