खेळ मांडला Khel Mandlaतुझ्या पायरीशी कुनी सानथोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला .... खेळ मांडला Khel Mandla

सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू र्‍हा हुबा
ह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला

उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भ्येगाळल्या भुईपरी जीनं अंगार जिवाला जाळी
बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे
इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला ... खेळ मांडला

Lyrics - गुरु ठाकूर Guru Thakur
Music - अजय-अतूल Ajay-Atul
Singer -अजय गोगावले  Ajay Gogavale
Movie / Natak / Album -नटरंग  Natrang

No comments:

Post a Comment