मला वेड लागले प्रेमाचे Mala Ved Lagle Premache


 
रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा 
कुंदकळ्यांना वेलींना  सांगा रे सांगा 
हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे 
का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे 
मला वेड लागले प्रेमाचे 

नादावले, धुंदावले, कधी गुंतले मन बावळे 
नकळे कसे कोणामुळे सूर लागले मनमोकळे 
हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा 
मला वेड लागले प्रेमाचे 

जगणे नवे वाटे मला, कुणी भेटला माझा मला 
खुलता कळी उमलून, हा मनमोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा 
मला वेड लागले प्रेमाचे 
 

Lyrics - गुरु ठाकूर Guru Thakur,
Music - चिनार - महेश Chinar - Mahesh,
Singer - केतकी माटेगावकर - स्वप्नील बांदोडकर Ketaki Mategaokar - Swapnil Bandokar,
Movie / Natak / Album - टाईमपास Timepass

No comments:

Post a Comment