हुप्पा हुय्या HUPPA HUIYA


हुप्पा हुय्या, जय बजरंगा
भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती
वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना
जय हनुमान, जय जय हनुमान
जय जय... जय जय... जय जय... जय जय...
जय जय... जय जय... जय जय... जय जय...
रामदासाचं  पुण्याईची काय सांगू महती
अकरा गावी प्रकट झाले अकरा मारुती
कुणी लंका जाळली , कशी सीता मिळाली
कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी
रामाचा भक्त ऐसा, वा-याचा पुत्र ऐसा
उडवी दाणादाणं, शत्रूची उडवी दाणादाणं
त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान
जय हनुमान ......
 त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान
जय जय हनुमान ......
जय बजरंग जय हनुमान
जय बलभीम जय जय श्रीराम ॥धृ॥
मारुती चुन्याचा असे शहापुराचा
उग्र चेह-याचा , गोंड्याच्या टोपीचा
हा  मसूरचा  हनुमान देखणा छान
होता दर्शन तयाचे लागते ध्यान
चाफळचा दास मारुती मुद्रा भक्तीची
प्रताप मारुती वीर मूर्ती शक्तीची
शिंगणं वाडीचं मंदिर, उंच ते फार
बाल मारुती गोजिरा, भक्ता आधार
त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूपं
चांदीचे डोळे देवाचे भावती खुपं
न्यायाच्या हक्कासाठी, बजरंग हा राही पाठी
विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण ॥१॥
घोड्याच्या तोंडाची मूर्ती माजगावाची
झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची
कृष्णाकाठी बहे निसर्गाचं देणं
श्रीरामासाठी धावले हनुमानं
कौलारू मंदिर आणि वाहता ओढा
मन पाडळ्याला हो पडे भक्तांचा वेढा
सपाट दगडावर कोरली छानं
आहे पार्गावाची मूर्ती ती लहान
आहे देउळ सुंदर बत्तीस शिराळा
तिथे सूर्यदेव येती हो दर्शनाला
आणाया रामराज त्या बजरंगाच आज
करूया जयजयकार गाऊया गोड  मुखाने नाव ॥२॥
चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान
जिवंत असुनी मेलेल्या दे संजीवनी आणून
कुविचार जे मनातले तू जाळी त्याची लंका
विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका
सूर्याचा करी घास वीरांचा वीर खासं
करितो तो उड्डाण देव मग घालितो थैमान ॥३॥

Lyrics -प्रकाश चौहान Prakash Chauhan
Music - अजित-समीर Ajit-Sameer
Singer -स्वप्निल बांदोडकर Swapnil Bandodkar
Movie / Natak / Album -हुप्पा हुय्या HUPPA HUIYA

2 comments:

  1. शेवटचे कडवे अगदी डोळ्यात पाणी आणतात

    ReplyDelete