हरवतो सुखाचा चेहरा HARAWATO SUKHACHA CHEHARA


हरवतो सुखाचा चेहरा का पुन्हा
एकटा मी तुझ्या शोधतो का खुणा
हरवते हातुनी पाहिजे जे मना
जिंकुनी हारते,खेळ आहे जुना 
साजणा तुझी याद
जाळी जीवाला या पुन्हा
मनात नाही,ये जिया
बैरी प्रीत मोहे छोड़े ना
शोधतो  रस्ता नवा,संपते  का असा
सांगण्या आधी कुणी,श्वास संपवा जसा
सरलेल्या क्षणांचे उडून जाती थवे
मी पुन्हा शोधते,एकटे पण नवे
दुःख हे एवढा लावते का लळा
मीच का एकटा सांग ना  रे मना
हरवते हातुनी पाहिजे जे मना
जिंकुनी हारते,खेळ आहे जुना
 कोसळे आभाळ हे मन तसे वाहते
ही निखारे का असे सुलगती आटले
थकलेल्या जिवाला नीज येईल का
दुःख या अंतरीचे कोणी जानेल का
नेमके हवे काय होते असे
एकट्या क्षणांनवर सोबतीचे ठसे
हरवते हातुनी पाहिजे जे मना
जिंकुनी हारते,खेळ आहे जुना 
साजणा तुझी याद
जाळी जीवाला या पुन्हा
मनात नाही,ये जिया
बैरी प्रीत मोहे छोड़े ना

Lyrics -अश्विनी शेंडे ASHWINI SHENDE
Music -अविनाश -विश्वजित AVINASH-VISHWJIT
Singer -बेला शेंडे,कैलाश खैर,हृषिकेश रानडे BELA SHENDE,RISHIKESH RANADE
Movie / Natak / Album -प्रेमाची गोष्ट २०१३ 

No comments:

Post a Comment