भरुन भरुन आभाळ आलंय Bharun bharun aabhal aalay

भरुन भरुन, आभाळ आलंय
भरल्या वटीनं जड जड झालंय
शकुनाचा आला वारा, माझ्या मनात ओल्या धारा
आला वास ओला, मातीचा सोयरा

तुला चिंचा बोरं देऊ का ही, देऊ का ही गं
काय मनात कानात सांगून दे तू माझ्या बाई गं
पान पानाला सांगून जाई, कणी सुखानं भरली बाई
गळूनी फूल आता, फळ आलं मोहरा

भर दिसा कशाची चाहूल आली आली बाई गं
जीव उगाच वेडा हसतो, पुसतो काही बाई गं
कशी इकडचं घेऊ नावं, माझं गुपित मजला ठावं
फिरत्या पावलांचा झाला गं भोवरा

बीज रुजून झाली लेकूरवाळी, धरती बाई गं
तान्ह्या रुपाला पान्हा पाजत हसते काळी आई गं
तट तटाला झोका देई, पान सळसळ गाणं गाई
हाती काय येई, जाई की मोगरा


Lyrics - शांता शेळके,Shanta Shelke,
Music - श्रीधर फडके Shridhar Phadke,
Singer - अनुराधा पौडवाल,Anuradha Paudwal,
Movie / Natak / Album -लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव  Laxmibai Bhratar Vasudev

No comments:

Post a Comment