सनई संगे झडे चौघडा
डोईवरती पडती अक्षता
मंगलाष्टके सुरात झडती
फेरे पडती सात
लग्नमंडपी दोन जीवांची होते नवी सुरुवात
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी
आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी ...वाजवा हो तुतारी
हो...किती प्रेमाने चघळले तरी चीन्गमची साखर सरते
तशीच सरता नवी नवलाई गोडी गुलाबी हवेत विरते
रोमीओचा हिटलर होतो ज्युलीएट सुरी दुधारी
दुधारी...सुरी...सुरी...सुरी
आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी ...वाजवा हो तुतारी
हो चकमक ही घनघोर पेटता
ती अपुले ब्रम्हास्त्र सोडते
बघून तिच्या डोळ्यातील पाणी
त्याचे तर अवसानच गळते
युद्ध संपते मिठीत उरते साखर विरघळणारी
आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी ...वाजवा हो तुतारी
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी
प्रेमे आलिंगन आनंदे मिलन, विवाह बंधन हेच खरे
शुभ मंगल सावधान !
Lyrics - Guru Thakur गुरु ठाकूर
Music - निलेश मोहरीर Nilesh MoharirSinger - अवधूत गुप्ते , वैषाली सामंत
Movie / Natak / Album - मंगलाष्टक वन्स मोर, Mangalashtak Once More
No comments:
Post a Comment