दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणिवांना गंध ओले Diwas Olya Paklyanche


दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणिवांना गंध ओले
स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले
दिवस वेडे स्वप्न पंखी रेशमाची झूल झाले
ओंजळीने मागण्या आधीच सरले मेघ सारे

दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणिवांना गंध ओले
दिवस थोडे स्पर्श वेडे दोन आतुरल्या जीवांचे
हरवलेले भान केवळ श्वास होते बोललेले
दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणिवांना गंध ओले


दिवस मोहरल्या मनाचे सुख नवे घेऊन आले
चांद थोडा लाजला अन चांदणे टिपूर झाले
दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणिवांना गंध ओले
स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले
दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणिवांना गंध ओले

Music - निलेश मोहरीर Nilesh Moharir
Singer - स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे Bela Shende, Swapnil Bandodkar
Movie / Natak / Album - मंगलाष्टक वन्स मोर Mangalashtak Once More

No comments:

Post a Comment