करुया दंगा करुया पंगा
पुस्तक पाटी खुंटीला टांगा
उठता बसता नसेल आता
अभ्यासाचा सल्ला
धीडकाउनिया साऱ्या चिंता
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
धमाल फंडे शोधून सारे
या अकलेचे तोडू तारे
हुल्लड बाजी चिल्लर चाळे
पुन्हा नव्याने सुरु करारे
मिळेल संधी जिथे चकटफू
खुशाल मारू गल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
प्रश्न शेकडो लाखो शंका
मनात त्याचा वाजे डंका
मोठे करती मुस्कट दाबी
वाढत जातो त्यातून गुंता
जोवर नाही मिळत रे
तोवर लढवू किल्ला किल्ला किल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करू नका हे करू नका ते
हुकुम हजारो सुटतील येथे
उठता बसता जो तो केवळ
उगाच देईल सल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
करूया आता कल्ला कल्ला कल्ला
Lyrics -
Music - Vishal Shekhar विशाल -शेखर
Singer - Vishal Dadlani विशाल ददलानी
Movie / Natak / Album - बालक पालक BP (Balak – Palak)
No comments:
Post a Comment