राम होउनी राम गा रे Ram houni Ram Ga re


राम होउनी राम गा रे
रामासी शरण निघा रे

कोण कैचा हे विचारा
नका कर्म करू व्यभिचारा

हा दु:स्तर भव हराया
तुम्ही जोडा सखा गुरुराया

म्हणे माणिक निज राम पहावा
तया लागी हृदयीच जपावा

No comments:

Post a Comment