सुख देवासी मागावे,Sukha Devasi Magave

सुख देवासी मागावे
दुःख देवाला सांगावे

देव मागे, देव पुढे
देव आहे चोहीकडे
डोळे मिटूनी बघावे

धाव घ्यावी देवापाशी
जशी माउलीच्या कुशी
तान्हियाने प्रेम प्यावे

देव प्रेमळ प्रेमळ
देव आरसा निर्मळ
बिंब तयात पहावे

No comments:

Post a Comment