सोनुल्या, गुपित सांगते तुला
तुला पाहता आयुष्याचा अर्थ मला समजला
जणू बिलोरी हसरी कमळे
तुझे टपोरे सुंदर डोळे
आभाळाच्या पलिकडचेही त्यातुन दिसते मला !
तुझे, गुलामा, घेता चुंबन
होते मजवर अमृत-सिंचन
या सौख्याचा हेवा करुनी चंद्र झुरू लागला !
अज्ञातातुन उदया आला
घरात माझ्या किरण कोवळा
झुळझुळत्या या आनंदाहुन देव काय वेगळा !
तुला पाहता आयुष्याचा अर्थ मला समजला
जणू बिलोरी हसरी कमळे
तुझे टपोरे सुंदर डोळे
आभाळाच्या पलिकडचेही त्यातुन दिसते मला !
तुझे, गुलामा, घेता चुंबन
होते मजवर अमृत-सिंचन
या सौख्याचा हेवा करुनी चंद्र झुरू लागला !
अज्ञातातुन उदया आला
घरात माझ्या किरण कोवळा
झुळझुळत्या या आनंदाहुन देव काय वेगळा !
No comments:
Post a Comment