सौंदर्याची खाण पाहिली,Saundaryachi Khan Pahili

सौंदर्याची खाण पाहिली, पाहिली आम्ही पहिल्यांदा
नयनांमधला बाण लागला, लागला आम्हा पहिल्यांदा

वाटते परंतु सांगाया ना जुळे
डोळ्यांत आमुच्या भाव नवे आगळे
बोलल्या वाचुनी गूज तुम्हाला कळे
शब्द मधाचे ठिबकू द्यात ना, ठिबकू द्या कानी पहिल्यांदा

हा रंग गोड का गालावरची खळी
पाहता आमुच्या पावन झाल्या कुळी
उपजली उगीचच मनात आशा खुळी
घायाळाची गती समजली, समजली आम्हा पहिल्यांदा

या आधी आम्हा माहीत नव्हती प्रीती
परी आज सुखाचा स्वर्ग लागला हाती
कधी दोन मनांची जुळून येतील नाती
नकळत चेटुक होय आम्हावर, आम्हावर असले पहिल्यांदा

1 comment: