साऊलीस का कळे,Saulis Ka Kale

साऊलीस का कळे उन्हामधील यातना ?
जाणवेल मीलनी कोण विरह वेदना ?

असती माहिती कशी नदीस घोर वादळे ?
आसवांत जग बुडे; मृगजळास का कळे ?
जी व्यथा नभातली, ती कथाच अंगणा !

फूलपंखी का कधी गरूड झेप घेतसे ?
काजळी तमास का रंग कोण देतसे ?
हृदयशून्य करील कोण मंदिरात प्रार्थना

रजनीच्या घरी कधी होई सूर्य पाहुणा ?
दिसती ना कधी कुणा अंतरातल्या खुणा ?
सांगते अबोली का कुणास मुग्ध भावना ?

No comments:

Post a Comment