सा सागरसा सा (१),Sa Sagar Sa (1)

’सा’ सागर उसळे कैसा
’रे’ रेती बुडवी किनारे
’ग’ गलबत चाले लगबग
’म’ मनुष्य वादळी दुर्गम
’प’ पडाव येती झपझप
’ध’ धरणी गाठी सावध
’नी’ निळ्या सागरी पोहुनी
सात स्वरांची ही कहाणी !

1 comment:

  1. फार सुंदर अर्थपूर्ण गाणं

    ReplyDelete