सापडले रे सापडले,Sapadale Re Sapadale

सापडले रे सापडले
ते सापडले रे सापडले
ते सापडले

रात्रंदिन जे धुंडित होतो
अजुनी होते जे दडले
रे सापडले ते सापडले

केले होते वेडे ज्यांनी
कोडे अवघड उलगडले
हपापलेल्या हृदयावरती
अमृत कुणीतरी शिंपडले
रे सापडले ते सापडले

नयनी भरले हृदयी शिरले
शब्दांच्या जे पलीकडले
देवाहुनीही थोर मनोहर
दर्शन त्याचे मज घडले
रे सापडले ते सापडले

No comments:

Post a Comment