विठ्ठला रे, तुझ्या नामी रंगले मी
रूप तुझे साठविते अंतर्यामी
तुझ्या कीर्तनाचा गंध
करितसे जीव धुंद
पंढरीचा हा प्रेमानंद
भोगिते मी अंतर्यामी
तुझी सावळी ही कांती
पाडी मदनाची भ्रांती
ध्यान तुझे लावियले
सुंदराचा तूच स्वामी
तुझ्या भजनी रंगता
हृदय काम धाम चिंता
रुख्मिणीच्या रे सख्या कांता
मोहरते मी रोमरोमी
रूप तुझे साठविते अंतर्यामी
तुझ्या कीर्तनाचा गंध
करितसे जीव धुंद
पंढरीचा हा प्रेमानंद
भोगिते मी अंतर्यामी
तुझी सावळी ही कांती
पाडी मदनाची भ्रांती
ध्यान तुझे लावियले
सुंदराचा तूच स्वामी
तुझ्या भजनी रंगता
हृदय काम धाम चिंता
रुख्मिणीच्या रे सख्या कांता
मोहरते मी रोमरोमी
No comments:
Post a Comment