वाट संपता संपेना,Vaat Sampata Sampena

वाट संपता संपेना कुणी वाटेत भेटेना
कुठे आलो असा कसा कुणी काहीच सांगेना

लांब लांब उंच घाट वाट वाकडी तोकडी
दूर दूर अंधारात एक दिसते झोपडी
सूर येती अंधारती कुणी गीतही म्हणेना

दिसे प्रकाश अंधुक नभी ताrऱ्यांचा कंदील
अंतर दोन मैलांचे आता गाठीन मंझील
आकाशात रात्र फुले चंद्र काहीच ऐकेना

No comments:

Post a Comment